जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की आम्ही कुमार ॲण्ड पोतनीस कन्स्ट्रक्शन्स एलएलपी (जी पूर्वी मे. कुमार अँड पोतनीस या नावाने भागीदारी संस्था होती व जिचे भागीदार श्री. राजस विमलकुमार जैन, श्री. श्रीकृष्ण विठ्ठलराव विंचुर्कर, श्री. आदित्य श्रीरंग पोटनिस व कुमार अँड पोटनिस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड हे होते), मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ अन्वये नोंदणीकृत एक मर्यादित दायित्व भागीदारी, ज्यासी एलएलपीआयएन: ABZ ७५३१ आहे आणि जिचा नोंदणीकृत पत्ता पी. एल. क्र. ७०/२२ ओटा क्र.६, पुणे सिटी, पुणे, महाराष्ट्र ४११ ००४ भारत येथे आहे (सदर "संस्था") यांचे खाली नमूद केलेल्या परिशिष्टामध्ये सविस्तररित्या वर्णन केलेली जमीन मिळकत आणि त्यावरील काही विद्यमान बांधकामे (सदर मिळकत) या बाबत सदर संस्थेचे हक्क, हितसंबंध व अधिकार पडताळत आहोत. सदर संस्थेने आमच्या पक्षकारास असा भरवसा दिला आहे की सदर संस्थेचे सदर मिळकतीबाबतचे मालकीहक्क निर्वेध, बोजारहित व पणनयोग्य असून कुठल्याही जडजोकमीत गुंतविलेले नाहीत. तरी सदर मिळकत व / वा त्यामधील कुठलेही भाग, किंवा त्यातील एफ.एस.आय / टीडीआर वा विकसानाचे हक्कांबाबत अथवा सदर संस्थे विरुद्ध व / वा त्याच्या कोणत्याही भागीदारांविरुद्ध व / वा पूर्वीची भागीदारी मे. कुमार अँड पोतनीस व / वा तिचे भागीदार यांचे विरुद्ध (सदर मिळकती बाबत ), अन्य कोणाचाही (यामध्ये बँका, वित्तीय संस्था किंवा गैर बँकिंग वित्त संस्था यांचाही समावेश आहे) कोणत्याही प्रकारचा विक्री, हस्तांतर, तबदील, अदला बदल, अग्रहक्क, दस्त, करारनामा, विकसन करार, गहाण, भाडे करार, पोट भाडेकरार, लायसंस, केर टेकर बेसीस, हिस्सा, वारसा, बोजा, इजमेंट, ट्रस्ट, मृत्युपत्र, हक्कसोड, न्यास, पोटगी, बक्षीस, बारसहक, खरेदी, ताबेहक्क, लीस पेंडन्स, लेटर ऑफ इंटेंट, कुटुंब व्यवस्था / सेटलमेंट, कोर्टाचे हुकूम, याद्वारे अथवा अन्य कुठल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध व / वा अधिकार ( " क्लेम ") असल्यास त्याची लेखी माहिती / हरकत कागदपत्रे व पुरव्यासह प्रस्तुत नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आत वाडिया घांदी अॅण्ड कंपनी (पुणे), ॲडव्होकेट्स अॅण्ड सॉलिसिटर्स, यांचेकडे ३०१, अमेलिया, १९०२ ए / ६, शिवाजीनगर, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी, पुणे ४११०१६ येथे व / वा ई-मेल द्वारे denzilarambhan@wadiaghandy.com आणि akshay.gandhi@ wadiaghandy.com येथे सादर करावी व सदर बोजा, मालकी हक्क व / वा हितसंबंध याबाबत खात्री करुन द्यावी. सदर मुदतीत कोणतीही हरकत व / वा आक्षेप न आल्यास कुठल्याही तथाकथित क्लेम, हक्क, हितसंबंध वा अधिकार याची दखल घेतली जाणार नाही व असे तथाकथित हक्क / हरकत जाणून बूजून सोडून दिले आहे असे समजण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. वर उल्लेखिलेले परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन) तुकडी व जिल्हा पुणे, पोट तुकडी व तालुका हवेली येथील गाव मौजे बाणेर, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील, एकूण १,८६,३०० चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या सर्व्हे क्र.९४/१/९५/९६/१ ते ४/९७ पैकी ९२,९६४.८२ चौरस मीटर क्षेत्रामधील एकूण ३४,६३८.६४ चौरस मीटर क्षेत्रफळ असणारी जमीन, ज्यामध्ये (१) २७,७३५.८७ चौरस मीटर क्षेत्र असणारा प्लॉट के -२, आणि (२) उच्च माध्यमिक शाळा आणि खेळ मैदान या आरक्षणांनी बाधित एकूण २८,२०१ चौरस मीटर क्षेत्रामधून ६,९०२.७७ चौरस मीटर क्षेत्र समाविष्ट आहे, व ज्यांसी चतुःसीमा खालील प्रमाणे आहे - पूर्वेस : १२ मीटर रुंद सर्व्हिस रस्ता व तदनंतर मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, दक्षिणेस : २४-मीटर डी. पी. रस्ता, पश्चिमेस १२ मीटर रुंद अंतर्गत रस्ता तदनंतर मोहननगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, उत्तरेस : उच्च माध्यमिक शाळा आणि खेळ मैदान या आरक्षणांनी बाधित क्षेत्र त्यावर असलेल्या बांधकामांसह. ठिकाण पुणे : दिनांक : ५/०२/२०२५ वाडिया घांदी अॅण्ड कंपनी (पुणे) करीता, अॅड. अक्षय अ. गांधी, भागीदार Public notice This public notice is to inform all the public that we Kumar & Potnis Constructions LLP (Formerly a partnership firm named M. Kumar & Potnis and whose partners are Mr. Rajas Vimalkumar Jain, Mr. Srikrishna Vitthalrao Vinchurkar, Mr. Aditya Srirang Potnis and Kumar & Potnis Properties Private Limited), a limited liability partnership registered under the Limited Liability Partnership Act, 2008, as LLPIN: ABZ 7531 and whose registered address is P. L. No. 70/22 Ota No.6, Pune City, Pune, Maharashtra 411 004 India (the "Institution") is verifying the rights, interests and rights of the said Institution in respect of the land income and certain existing structures thereon (the said Income) detailed in the annexure below. The said organization has given assurance to our party that the ownership rights of the said organization in the said income are unencumbered, unencumbered and marketable and not encumbered with any serious risk. However, the said income and/or any part thereof, or the FSI/TDR or development rights thereof or against the said organization and/or against any of its partners and/or previous partnerships. against Kumar & Potnis and/or its partners (in respect of such income), to any other person (including banks, financial institutions or non-banking financial institutions) of any sale, transfer, transfer, barter, lien, title, deed, agreement, development agreement, mortgage, lease agreement, sub-tenancy, license, caretaker basis, share, inheritance, encumbrance, easement, trust, bequest, relinquishment, Trust, alimony, award, leasehold, purchase, subrogation, lease pendency, letter of intent, family arrangement / settlement, court order, whether by this or otherwise, any right, interest and / or right ("Claim") within 14 (fourteen) days from the publication of the present notice with written information / objection documents and supplies thereof to Wadia Ghandi & Company (Pune), Advocates & Solicitors, to 301, Amelia, 1902 A / 6, Shivajinagar, Lakaki Road, Model Colony, Pune 411016 and / or by e-mail at denzilarambhan@wadiaghandy.com and akshay.gandhi@ wadiaghandy.com and confirm the said encumbrance, ownership and / or interest. Please note that if there is no objection and/or objection within the said period, any so-called claim, right, interest or right will not be taken into consideration and such so-called right/objection will be deemed to have been knowingly waived. Appendix mentioned above (Description of Income) Village Mauje Baner in Tukdi and District Pune, Pot Tukdi and Taluka Haveli, Pune Municipal Corporation, land having a total area of ​​34,638.64 sq.m., in Survey No. 94/1/95/96/1 to 4/97 with a total area of ​​1,86,300 sq.m. Plot K-2 having an area of ​​m., and comprising 6,902.77 sq. m. out of the total area of ​​28,201 sq. m. affected by reservations, and (2) High Secondary School and Playground, and whose quadrilateral boundaries are as under - East : 12 m wide service road and then Mumbai-Bengaluru National Highway no. 4, South : 24-meter d. P. Road, West 12m wide internal road then Mohannagar Cooperative Housing Society Limited, North : High Secondary School and Playground Area affected by reservation with the structures on it. Place Pune : Date : 5/02/2025 For Wadia Ghandi & Company (Pune), Adv. Akshay A. Gandhi, partner