जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते कि, पुणे महानगर पालिका, पुणे यांचे हद्दीतील गाव मौजे येवलेवाडी येथील सर्व्हे नंबर ३१, हिस्सा नंबर ३६ यांसी क्षेत्र ०० हेक्टर ६२ आर यांसी आकार ००रू.९१ पैसे यापैकी क्षेत्र ०० हेक्टर ०१.५० आर (दीड आर) म्हणजेच १५० चौ. मी. ( ताब्याप्रमाणे क्षेत्र १२१५ चौ. फूट) रस्त्यासहीत मिळकत, यांसी चतु: सिमा पुढील प्रमाणे :- पूर्वेस :- इरफान हिदायतुल्ला शेख यांची मिळकत, दक्षिणेस :- रस्ता, पश्चिमेस :- मझहर शफिउल्ला शेख यांची मिळकत व उत्तरेस :- रूखसाना इनामदार यांची मिळकत, येणेप्रमाणे चतु:सिमापुर्वक मिळकतीचे विद्यमान मालक अमानुल्ला अब्बास शेख यांचे खरेदी मालकीहक्काची व ताबेवहिवाटीची आहे. सदर जमीन मालकांनी जहागिरदार | डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स तर्फे मुनीर अब्दुल शेख यांना कुलमुखत्यार दिलेले आहे. अमानुल्ला अब्बास शेख यांचे तर्फे कु.मु. म्हणून जहागिरदार डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स तर्फे मुनीर अब्दुल शेख यांनी हारून रशिद शाह मोहम्मद खान यांना नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र करून दिलेले आहे. सदर मिळकत ही कुलमुखत्यार पत्र धारकांनी आमचे अशिलांना खरेदी देण्याचे ठरवले असून त्यापोटी विसार रक्कम सुध्दा आमचे अशिलांकडून स्वीकारली आहे. सदर मिळकत ही निर्वेध व निजोखमी आहे, असा भरवसा सदर जमीन मालकांचे वतीने कुलमुखत्यार धारकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. सदर संदर्भात कोणाचाही कसलाही हक्क म्हणजे गहाण, दान, लिज, लिन, करार, कुळ, पोटगी, अन्न-वस्त्र, जप्ती, वहीवाट, खरेदीखत, करारनामा, कुलमुखत्यार पत्र, विसार पावती, ताबा, बँक बोजा वा तत्सम स्वरूपाचा असल्यास वा इतर कोणाचा काही हक्क वा आधिकार असल्यास अशा इसमांनी प्रस्तूतची नोटीस प्रकाशित झाल्यापासून १० (दहा) दिवसांच्या आत अस्सल कागदोपत्री पुराव्याने आपला हक्क शाबीत करावा. तशी मुदतीत तजवीज न झाल्यास कोणाचाही हक्क नाही वा असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला असे समजून आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. तनंतर कोणाचीही कसलीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी, कळावे ही जाहीर नोटीस दिली असे. पुणे, दिनांक :- ०४/०२/२०२५. ऑफीस पत्ता — अॅड. एस. एस. गायकवाड केअर ऑफ शरद गायकवाड असोसिएटस, दुकान नं. ४, तळ मजला, मारूती कॉम्पलेक्स, खडी मशीन चौक, कोंढवा बुद्रुक, पुणे ४११०४८. मो नं. ८४११८५११२२ / ९३०७४५४७४७. Public notice All the people are informed that, Survey No. 31, Share No. 36 of Village Mauje Yevlewadi within the limits of Pune Mahanagara Palika, Pune Area 00 Hectares 62Rs Size 00Rs.91 paise Out of which Area 00 Hectares 01.50Rs (one and a half R) i.e. 150 Sq. I. (Area 1215 Sq.ft.) Income including road, Yansi chatu: Boundary as follows :- East :- Irfan Hidayatullah Sheikh's income, South :- Road, West :- Mazhar Shafiullah Sheikh's income and North :- Rukhsana Inamdar's income, as follows. Possession. Jagirdar | Developers and Builders has appointed Munir Abdul Sheikh as attorney general. On behalf of Amanullah Abbas Sheikh, Mr. Therefore Munir Abdul Shaikh on behalf of Jagirdar Developers and Builders has sent a registered attorney letter to Haroon Rashid Shah Mohammad Khan. The said income has been decided to be purchased by the Kulmukhtyar letter holders and we have also accepted the visar amount from our clients. The assurance that the said income is safe and secure has been given to our clients by the power of attorney holders on behalf of the said land owners. In this regard, if any right of any person i.e. mortgage, donation, lease, lien, contract, clan, alimony, food and clothing, confiscation, transfer, purchase deed, contract, power of attorney, receipt, possession, bank encumbrance or similar nature or if anyone else has any right or authority, such persons should prove their right with authentic documentary evidence within 10 (ten) days from the publication of the notice of presentation. If no notification is given within the time limit, then our customers will complete the purchase transaction assuming that no one has any right or if they have deliberately waived it. After that, no one's complaint will be entertained. A public notice was given to please take note of this. Pune, Dated :- 04/02/2025. Office address — Adv. S. S. Gaikwad Care of Sharad Gaikwad Associates, Shop no. 4, Ground Floor, Maruti Complex, Khadi Machine Chowk, Kondhwa Budruk, Pune 411048. Mo No. 8411851122 / 9307454747.